सन २०११ च्या जनगणनेनुसार, ग्रामपंचायत कर्हे-तलावली , ता. विक्रमगड, जि. पालघर यांच्या हद्दीत कर्हे व टाळवली या गावांचा समावेश असून ग्रामपंचायतीची एकूण लोकसंख्या सुमारे ३,१७१ आहे. यामध्ये अंदाजे १,५७० पुरुष व १,६०१ महिला नागरिकांचा समावेश आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात एकूण ५१३ कुटुंबे वास्तव्यास असून शेती, मजुरी व वनउत्पादन हे येथील नागरिकांचे प्रमुख उपजीविकेचे साधन आहे. ग्रामपंचायत स्थानिक विकास, मूलभूत सुविधा व शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यरत आहे.